पुलावर पाणी साचल्याने वाहनचालकांना नाहक त्रास, त्वरित दुरुस्तीची मागणी
वार्ताहर /धामणे
नागेनहट्टी गावाला पाणीपुरवठा होत असलेल्या जलवाहिनीतील नागेनहट्टी- नंदिहळ्ळी मेन रस्त्यावर असलेल्या ब्रिजवर गळती लागल्याने या ब्रिजवर पाणी साचत आहे. त्यामुळे येथून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या ब्रिजचे काम निकृष्ठ दर्जाचे करण्यात आले आहे. ब्रिजवरती सर्वत्र ख•s पडले असून या ब्रिजवरून एका बाजूने नागेनहट्टी गावाला पाणीपुरवठा करण्यात येत असलेली जलवाहिनी नादुरुस्त झाल्याने पाणी या ब्रिजवर साचत आहे. त्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना ब्रिजवर साचलेल्या पाण्याचा त्रास होत आहे. हे पाणी कायम असेच साचत राहिले तर या ब्रिजलासुद्धा धोका पोहचेणार आहे. त्यामुळे निदान आतातरी नादुरुस्त झालेली जलवाहिनी तातडीने दुरुस्त करून येथून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना दिलासा द्यावा. तसेच नागेनहट्टी गावाला पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी वाहनचालक व नागरिकांतून आता जोर धरु लागली आहे.









