वार्ताहर /सांबरा
मुतगे-मुचंडी संपर्क रस्त्यावरील बळ्ळारी नाल्यावरील हिडकलच्या जलवाहिनीला गेल्या वीस दिवसांपासून गळती लागली असून मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात आहे. ऐन उन्हाळ्यामध्ये पाणी वाया जात असल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. मुतगे-मुचंडी संपर्क रस्त्यावर असलेल्या बळ्ळारी नाल्याच्या बाजूने गेलेल्या हिडकलच्या जलवाहिनीला गेल्या 20 दिवसांपासून गळती लागली आहे. मात्र याकडे संबंधितांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे दररोज पाणी मोठ्या प्रमाणात वाया जात आहे. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी जलवाहिनीची पाहणी करून पाण्याचा अपव्यय थांबवावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.









