पालकमंत्र्यांचे आदेश असतानाही दारू वाहतूक सुरु असल्याचे उघड
प्रतिनिधी
बांदा
गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या दोन क्रेटा गाडीवर एलसीबी कडुन थरारक पाठलाग करून कारवाई केली. ही कारवाई बुधवारी पहाटे इन्सुली कोठावळेबांध येथे करण्यात आली . या कारवाईत एका क्रेटा गाडीचा चालक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. तर दुसऱ्या क्रेटा गाडीचा चालक गाडी शेतात टाकून फरार झाला आहे. त्याचा शोध एलसीबी सिंधुदुर्गचे पथक घेत आहेत. या कारवाईमुळे अवैध वाहतूकदारांची पळापळ सुरु झाली आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी अवैध धंदे बंद करण्याच्या सूचना दिल्या असताना ही गाडी कोणाच्या आशीर्वादामुळे दारू घेऊन आली याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान जिल्हा पोलीस प्रमुखांच्या समोर आहे. या कारवाईत किती मुद्देमाल जप्त करण्यात आला याची माहिती अद्याप हाती लागली नाही.









