नोकरीसाठीची जाहिरात व्हायरल, आंघोळ करून यावे अशी अट
सर्वसाधारणपणे एका जॉबसाठी लोकांकडून त्यांची पात्रता, अनुभव आणि कौशल्य पाहिले जाते. परंतु एका जॉबमध्ये कुठलीही पदवी किंवा विशेष गुणवत्तेची गरज नाही. हा जॉब मिळविण्यासाठी केवळ तुमच्यामध्ये दोन गुण असायला हवेत. जर तुम्ही आळशी आणि दुःखी असाल तर या जॉबसाठी अत्यंत योग्य उमेदवार आहात.
विशेष बाब म्हणजे या अनोख्या जॉबविषयी जाहिरातीद्वारे लोकांना सांगण्यात येत आहे. ही जाहिरात अनेक ठिकाणी झळकली आहे. एका व्यक्तीने याचे छायाचित्र काढून ते ट्विटरवर शेअर केले आहे.

व्हायरल जाहिरातीत कंपनीला कशाप्रकारच्या उमेदवाराची गरज आहे हे नमूद आहे. सर्वात बोल्ड फॉन्टमध्ये ‘स्टाफची गरज आहे’ असे लिहिले आहे. उमेदवार, आळशी आणि दुःखी असावा, जेणेकरून तो येथे पूर्वीपासून काम करणाऱया कर्मचाऱयांमध्ये मिसळून जाईल. सी.व्ही.सोबत या, परंतु येण्यापूर्वी स्नान करून या असे या जाहिरातीत म्हटले गेले आहे.
ही जाहिरात एका दुकानाच्या खिडकीवर लावण्यात आली होती असा काही लोकांचा दावा आहे. पांढऱया कागदावर प्रिंट करत याला ब्ल्यू टॅगद्वारे लावण्यात आले होते. लोकांना हा जॉब अत्यंत पसंत पडतोय कारण यात कुठल्याही प्रकारची विशेष गुणवत्ता किंवा अनुभवाची गरज नाही.
या पोस्टवर हजारो लोकांनी रिऍक्ट केले आहे. तर अनेक लोक ही जाहिरात म्हणजेच चेष्टेचा प्रकार असल्याचे मत व्यक्त करत आहे. एका युजरने ‘मी तर याच जॉबसाठी परफेक्ट’ असल्याचे म्हटले आहे.









