हल्लेखोरांनी झाडल्या तीन गोळ्या
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारची राजधानी पाटण्याच्या सुलतानगंज पोलीस ठाण्याच्या परिसरात दिवसाढवळ्या गोळीबाराची मोठी घटना उघडकीस आली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी तीन गोळ्या झाडून एका नामवंत वकिलाची हत्या केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पाटणा शहराचे एएसपी अतुलेश झा आणि सुलतानगंज पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन रिकामे काडतुसेही जप्त केली आहेत. गोळीबार झाल्याची पुष्टी झाल्यानंतर एफएसएल (फॉरेन्सिक सायन्स लॅब) टीमलाही माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनी हल्लेखोरांच्या शोधासाठी पथके रवाना केली असून वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारेही गुन्हेगारांचा तपास केला जाणार आहे.









