Harish Salve : न्यायाधिशांच्या नेमणुकीवर सरकार आणि न्यायपालिका यांच्यातील मतभेदांबद्दल किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी अलिकडच एक विधान केल्याने गदारोळ उडाला. त्यांच्या या टिप्पणीवर नाराजी व्यक्त करताना, ज्येष्ठ वकील हरीश साळवे (Harish Salve) यांनी केंद्रीय कायदा मंत्र्यांनी ‘लक्ष्मण रेखा’ ओलांडली आहे असे म्हटले आहे.
जेष्ठ विधिज्ञ हरिश साळवे हे टाइम्स नाऊ समिट २०२२ च्या मेळाव्यात बोलताना म्हणाले, ” माझ्या मते कायदेमंत्र्यांनी लक्ष्मणरेषा ओलांडली आहे. जर त्यांना असे वाटत असेल की, सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) असंवैधानिक कायदा होत असताना निर्लज्जपणे पाहत सरकारच्या ओलीस राहावे, तर हे चुकीचे आहे.”
हरिश साळवे या कार्यक्रमात‘व्हॉट इज स्लोइंग इंडियाज ज्युडिशियल सिस्टीम?’ या विषयावर बोलत होते.
काही दिवसापुर्वी कायदा मंत्री रिजिजू यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणावर टीका केली होती. ते म्हणाले होते, सरकार “सरकार कॉलेजियमच्या फायलींवर बसून आहे, असे कधीही म्हणू नका, तुम्ही सरकारकडे कॉलेजियमच्या फायली पाठवूच नका…तुमची नियुक्ती तुम्ही स्वत: करा.” या कार्यक्रमात भारताचे माजी सरन्यायाधीश यूयू ललित ( U U Lalit) सुद्धा उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









