वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विश्व टेनिस संघाने बर्लिन येथे झालेल्या सांघिक टेनिस स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा लेव्हर टेनिस चषक पटकाविला. या सांघिक स्पर्धेतील अंतिम लढतीत विश्व संघाने युरोप संघाचा पराभव केला.
विश्व संघ आणि युरोप संघ यांच्यात लेव्हर चषकासाठी अंतिम लढत झाली. या लढतीत पुरूष दुहेरीच्या सामन्यात विश्व संघाचे बेन शेल्टन आणि टिफोई यांनी युरोप संघाच्या रूबलेव्ह व हुरकेझ यांचा पराभव केला. या दुहेरीच्या सामन्यात शेल्टन आणि टिफोई यांनी रूबलेव्ह व हुरकेझ यांचा 7-6 (7-4), 7-6 (7-5) असा पराभव केला. गेल्या महिन्यात झालेल्या अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत शेल्टन आणि टिफोई हे उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत परस्पराविरुद्ध उभे राहिले होते.









