नवी दिल्ली
लावा कंपनीचा ब्लेझ 2 हा स्मार्टफोन बाजारात लाँच झाला असून हा स्मार्टफोन 18 एप्रिलनंतर ग्राहकांना अॅमेझॉनवर खरेदी करता येणार असल्याचे सांगण्यात येते.
सदरच्या नव्या स्मार्टफोनची किंमत 8 हजार 999 ऊपये इतकी असणार असून 6 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेजसह हा फोन येणार आहे. नारंगी आणि निळ्या रंगात हा फोन उपलब्ध होणार असून युनिसॉक टी616 प्रोसेसर, 6.5 इंचाची एचडीप्लस आयपीएस स्क्रीन यात असणार आहे. याला 13 मेगापिक्सलचा पॅमेरा असेल.









