ओटवणे प्रतिनिधी
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशाल परब यांचा कुणकेरी गावातील प्रचाराचा शुभारंभ उमेदवार विशाल परब यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी अपक्ष उमेदवार विशाल परब यांचा कुणकेरी गावात डोअर टू डोअर प्रचार यंत्रणा राबवून कुणकेरी गावातून विशाल परब यांना मताधिक्य मिळवुन देण्याचा निर्धार कुणकेरी गावातील विशाल परब मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला. कुणकेरी गावाचे ग्रामदैवत श्री भावई व भवानी देवीच्या चरणी श्रीफळ ठेवून केला प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मनोज घाटकर, लक्ष्मम परब, जितेंद्र कुणकेरकर, परेश सावंत, निलेश गावडे, संजय मेस्त्री, कैलास सावंत, गुरुदास कुणकेरकर, सूरज देवणे आदी कुणकेरी गावातील विशाल परब मित्रमंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous Articleसिंधुदुर्गात 14 व 15 नोव्हेंबरला मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
Next Article माणगावात उबाठा सेनेला धक्का









