स्कायरुट कंपनीची अवकाश क्षेत्रात झेप
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
अंतराळ क्षेत्रात भारत सातत्याने इतिहास रचत आहे. देशाच्या राष्ट्रीय अंतराळ संस्था इस्रोने नुकतेच चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवले. यानंतर देशातील पहिली सूर्य मोहीम आदित्य-एल1 चे प्रक्षेपणही चर्चेचा विषय ठरले. अवकाश क्षेत्रातील ही यशस्वी कामगिरी पुढे नेत आता खासगी क्षेत्रातील कंपनी स्कायरूटही ‘विक्रम-1’ रॉकेट लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. भारतीय स्टार्टअप स्कायरूटने अलीकडेच दक्षिण हैदराबादमधील जीएमआर एरोस्पेस आणि इंडस्ट्रियल पार्कमध्ये ‘विक्रम-1’ रॉकेटचे अनावरण केले. यादरम्यान विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी स्कायरूटच्या नवीन मुख्यालय ‘द मॅक्स-क्मयू पॅम्पस’चे उद्घाटनही करण्यात आले. यावेळी त्यांनी भारत आता अंतराळक्षेत्रात इतर देशांचे नेतृत्व करण्याच्या स्थितीत आहे. स्कायरूट संस्था लवकरच विक्रम-1 ऑर्बिटल लॉन्च व्हेईकल प्रक्षेपित करेल अशी अपेक्षा त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली. विक्रम-1 या रॉकेटमधून उपग्रह पृथ्वीच्या खालच्या कक्षेत पाठवले जातील अशी अपेक्षा आहे. विक्रम-1 हे स्कायरूटचे दुसरे रॉकेट असून ते 2024 च्या सुऊवातीला प्रक्षेपित करण्याची योजना आहे. गेल्यावषी 18 नोव्हेंबरला विक्रम-एस रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले होते.









