प्रतिनिधी/ बेळगाव
प्रेस्टीज एंड्युरा प्रो मिक्सर-ग्राईंडरचे हजारे किचनवेअर येथे लाँचिंग करण्यात आले. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आयोजित या कार्यक्रमात हजारे किचनवेअरचे भागीदार तेजस्विनी व किशोर हजारे उपस्थित होते. त्यांच्याच हस्ते मिक्सर-ग्राईंडर लाँच करण्यात आले.
यावेळी भागीदार राहुल हजारे, प्रेस्टीजचे शाखा व्यवस्थापक शिवमूर्ती, विभागीय विक्री व्यवस्थापक शुभम जाधव, विक्री अधिकारी सागर पवार व प्रेस्टीजचे डिस्ट्रीब्युटर तसेच श्रीनिवास वेडिंग कंपनीचे पवन हेडा उपस्थित होते. एंड्युरा मिक्सर-ग्राईंडर विविध चौदा प्रकारच्या सुविधांनी उपलब्ध आहेत. यावेळी परिदी ओझा यांनी प्रात्यक्षिकही दाखविले.









