कोल्हापूर/प्रतिनिधी
महानगरपालिका परिवहन (के.एम.टी.) उपक्रमामार्फत महाविद्यालयीन विद्यार्थीनी, नोकरदार व नियमित प्रवास करणाऱ्या महिलांकरितां विशेष बस सेवेचा प्रारंभ पालकमंत्री सतेज पाटील यांचे हस्ते व श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत शाहू स्टेडियम येथून करण्यात आला.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, महापालिका उप-आयुक्त रविकांत आडसुळ, अति.परिवहन व्यवस्थापक मंगेश गुरव, सहा.आयुक्त विनायक औंधकर इ. मान्यवर उपस्थित होते.
बस शालेय / महाविद्यालयीन महिला विद्यार्थीनी, महिला कर्मचारी तसेच अन्य महिला वर्गासाठी शाहू मैदान येथून आर.के.नगर – जिल्हा परिषद मार्गे शुगरमिल व परत शुगरमिल येथून मार्गस्थ होऊन जिल्हा परिषद – आर.के.नगर मार्गे शाहू मैदान पर्यंत धावणार आहे. धांवेल. या बसमधून महिला प्रवाशांसोबत असणाऱ्या 3 ते 12 वया पर्यंतच्या लहान मुलांना प्रवास करतां येईल. या विशेष बस सेवचा लाभ अधिकाधिक महिला प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन परिवहन उपक्रमातर्फे करण्यात येत आहे.