गावातील प्रत्येक वाडीत कॅम्पचे आयोजन
ओटवणे प्रतिनिधी
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतुन सुरु करण्यात आलेल्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजनेचा कारिवडे गावातील सर्व लाभार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी कारिवडे ग्रामपंचायत गावातील प्रत्येक वाडीवर कॅम्प घेणार आहे. याचा शुभारंभ सरपंचा सौ. आरती अशोक माळकर यांच्याहस्ते करण्यात आला.
यावेळी कारिवडे पोलिस पाटील प्रदिप केळुसकर, भाजपा आंबोली मंडळ उपाध्यक्ष अशोक माळकर, तसेच आरोग्य आणि ग्रामपंचायत कर्मचारी आदी उपस़्थित होते.गावातील प्रत्येक वाडीवरील लाभार्थ्यांनी या कॅम्पमध्ये सहभागी होऊन या योजनांचा कारिवडे गावातील सर्व लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन कारिवडे सरपंचा सौ. आरती अशोक माळकर यांनी केले आहे.









