राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची मुख्य उपस्थिती : नौदलाची ताकद वाढणार
वृत्तसंस्था/ कोलकाता
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 17 ऑगस्ट रोजी कोलकाता येथे ‘आयएनएस विंध्यगिरी’ या युद्धनौकेचे लोकार्पण करणार आहेत. कर्नाटकातील पर्वतराजीवरून युद्धनौकेला विंध्यगिरी हे नाव देण्यात आले आहे. ‘आयएनएस विंध्यगिरी’ ही नौदलाच्या ‘17-ए’ प्रकल्पातील सहावी युद्धनौका आहे. 17 ऑगस्ट रोजी गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड, (‘जीआरएसई’) कोलकाता येथे राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते युद्धनौकेचे अनावरण होईल, असे नौदलाने सांगितले. जुलै 1981 ते जून 2012 पर्यंतच्या तिच्या सुमारे 31 वर्षांच्या सेवेदरम्यान, जुन्या विंध्यगिरीने (आयएनएस विंध्यागिरी) विविध आव्हानात्मक कारवाया आणि बहुराष्ट्रीय सरावात प्रत्यक्षपणे सहभाग घेतला होता.
‘आयएनएस विंध्यगिरी’ हे स्वदेशी संरक्षण क्षमतेच्या भवितव्याकडे स्वत:ला स्थान देताना समृद्ध नौदल वारशाचा स्वीकार करण्याच्या भारताच्या निर्धाराचे प्रतीक असल्याचे नौदलाने नमूद केले आहे. प्रकल्प 17-ए कार्यक्रमांतर्गत माझगाव डॉक लिमिटेडद्वारे एकूण चार आणि ‘जीआरएसई’द्वारे तीन युद्धनौकांची बांधणी सुरू आहे.









