प्रतिनिधी /बेळगाव
अयोध्यानगर येथील ‘हॉटेल यूके 27’मध्ये खवय्यांसाठी गोवन फूड फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे. बुधवार दि. 6 ते रविवार दि. 17 पर्यंत फूड फेस्टिव्हल असणार असून यामध्ये गोवन पद्धतीच्या शाकाहारी व मांसाहारी पदार्थांचा आस्वाद घेता येईल. कोकणी पद्धतीचा मसाला व इतर साहित्य वापरून अतिशय उत्तम पदार्थ तयार करण्यात आल्याची माहिती गोवन्सचे मास्टरसेफ हेन्झील साल्ढाणा यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
बेळगाव परिसरात येणाऱया खवय्यांना गोव्याच्या पदार्थांची चव चाखता यावी यासाठी गोवन फूड फेस्टिव्हल सुरू करण्यात आला आहे. बेळगावपासून गोवा जवळच असल्यामुळे या परिसरात अनेक खवय्ये आहेत. गोवा म्हणजे केवळ मासळी असे नसून अतिशय उत्तम असे शाकाहारी पदार्थ गोव्यात तयार केले जातात. या पदार्थांची नागरिकांना चव चाखता येणार आहे. मासळीमध्येही अनेक प्रकारचे मासे खवय्यांसाठी उपलब्ध असतील, असे हॉटेलचे जनरल मॅनेजर राहुल कानुंगो यांनी सांगितले.
गोवन पद्धतीची मासळी, चिकन, मटण, विविध भाज्या फेस्टिव्हलमध्ये ठेवल्या आहेत. पावसाळय़ात हे पदार्थ खूप चवीने खाल्ले जातात. त्यामुळे खवय्यांनी या फेस्टिव्हलचा आस्वाद घ्यावा, असे यावेळी सांगण्यात आले.









