सुरुवातीला अमेरिका व ब्रिटनमध्ये याची सुरुवात होणार
निवडक वापरकर्त्यांनाच करता येणार यामध्ये प्रवेश
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
गुगलने ओपन एआयचा इंटरअॅक्टिव्ह चॅटबॉट चॅटजीपीटीचा स्पर्धक बार्ड सार्वजनिक करत उपलब्ध करुन दिला आहे. तथापि, आता फक्त यूएस आणि यूकेमधील निवडक वापरकर्तेच यात प्रवेश करू शकणार असल्याची माहिती आहे.
चाचणीनंतर ते हळूहळू सर्व वापरकर्त्यांसाठी आणण्यात येणार आहे. गुगलने सांगितले की, भारत आणि जगातील इतर देशांमध्ये पोहोचण्यास वेळ लागू शकतो.
गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना सांगितले की, ‘80,000 गुगल कर्मचाऱ्यांसह बार्डची चाचणी केल्यानंतर, पहिली पायरी म्हणजे अमेरिका आणि ब्रिटनमधील काही लोकांसोबत त्याची चाचणी करणार असल्याचेही सांगितले आहे.
एआयच्या जगात, मायक्रोसॉफ्ट प्रमुख गुंतवणूक कंपनी ओपनएआय चॅटजीपीटी सध्या आघाडीवर आहे. चॅटजीपीटी गेल्या वर्षी 30 नोव्हेंबर रोजी लाँच करण्यात आले आणि एका महिन्यातच त्याचा वापर करणाऱ्यांची संख्या ही जवळपास दहा कोटींच्या पुढे गेली.
माहिती गोळा करण्यासाठी आणि नवीन डाटा तयार करण्यासाठी चॅटजीपीटी अशा एआय तंत्रज्ञानाचा वापर करते.









