नवी दिल्ली
इस्रोकडून चांद्रयान-3 पुढील महिन्यात म्हणजेच 12-19 जुलैदरम्यान प्रक्षेपित केले जाणार आहे. इस्रो अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी एक दिवसीय कार्यशाळा तसेच अंतराळ प्रदर्शनाच्या उद्घाटनादरम्यान ही माहिती दिली आहे. चांद्रयान यापूर्वीच यू.आर. राव उपग्रह केंद्रातून श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्राच्या प्रक्षेपण स्थळी पोहोचल्याचे त्यांनी सांगितले आहे. प्रक्षेपणाच्या अंतिम टप्प्याची तयारी सुरू आहे. प्रक्षेपणासाठी एलव्हीएम-3 या रॉकेटचा वापर केला जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.









