पूर्ण चार्जवर गाडी धावणार 150 किमी : प्रारंभीची किंमत 1.30 लाख रुपये
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
अॅथर एनर्जीने आपली इलेक्ट्रिक स्कूटर अॅथर 450 एस दोन प्रकारांमध्ये सादर केली आहे. यामध्ये टॉप स्पेक 450एक्ससह सादर करण्यात आली आहे. या स्कूटरची किंमत ही 1.30 लाख आणि 1.38 लाख रुपयांपासून सुरु होत आहे. 450 एस या नव्या गाडीची टीव्हीएस आयक्यूब, अर्म्पे प्राइम व ओला इलेक्ट्रिकच्या आगामी एस1 एअर सोबत स्पर्धा राहणार आहे.
कंपनी या इलेक्ट्रिक स्कूटरसोबत प्रो-पॅक देखील देत आहे. यात ऑटो होल्ड, ऑटो इंडिकेटर कट-ऑफ, ऑन बोर्ड नेव्हिगेशन, चोरी आणि टो अलर्ट, कॉल आणि म्युझिक कंट्रोल यांसारखी वैशिष्ट्यो मिळतील.
450एस सह प्रो पॅकसाठी खरेदीदारांना 14,000 रुपये अधिक द्यावे लागतील. तर 2.9 केडब्लूएच बॅटरीसह 450एक्स ची किंमत 16,000 रुपये असेल.
2500 रुपयांपासून बुकिंग
सदर स्कूटरचे बुकिंग हे 2500 रुपये टोकन मनी देऊन करता येईल. प्री-बुकिंग रक्कम परत करण्यायोग्य आहे.
कंपनी तिन्ही इलेक्ट्रिक स्कूटर टप्याटप्याने वितरित करेल.
450एस इलेक्ट्रिक स्कूटर 450एक्स मॉडेलवर आधारित असेल, परंतु 7.0-इंच टचक्रीनच्या जागी रंगीत एलसीडी डिस्प्ले मिळेल.
450एक्समध्ये हिल होल्ड असिस्ट, पार्क असिस्ट, राइड मोड्स, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि लाइव्ह ट्रॅकिंग यांसारखी अनेक प्रगत वैशिष्ट्यो आहेत.









