पंच, टियागो, टिगोरचा समावेश : विविध वैशिष्ट्यो समाविष्ट
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
टाटा मोटर्सने ट्वीन सिलेंडर तंत्रज्ञानासहच्या 3 कार्सचे नुकतेच बाजारात लाँचिंग केले आहे. यामध्ये पंच आयसीएनजी, टियागो आयसीएनजी आणि टिगोर आयसीएनजी यांचा समावेश आहे.
एसयुव्ही प्रकारातील सुरक्षेसंबंधी पाच स्टार मिळवलेली पंच आयसीएनजी तंत्रज्ञानाची भारतातील पहिली स्वस्त कार असल्याचा दावा कंपनी करते असून या गाडीची सुरुवातीची किमत 7.10 लाख रुपये असणार आहे. ही गाडी 26 कि.मी.चे मायलेज देईल, असेही सांगितले जात आहे.
कंपनीने सर्वात आधी 9 मे रोजी 2023 रोजी अल्ट्रोज सीएनजी ट्वीन सिलेंडर तंत्रज्ञानावर आधारीत लाँच केली होती. फेब्रुवारी 2022 मध्ये टियागो, टिगोर या गाड्या सिंगल सिलेंडरसह लाँच करत सीएनजी प्रकारात टाटा मोटर्सने प्रवेश मिळवला होता.
सदरच्या 3 नव्या कार्समध्ये गॅस गळती शोधणारे वैशिष्ट्या दिले आहे. गॅस गळती झाल्यास तंत्रज्ञानामुळे गाडी आपोआप सीएनजीवरुन पेट्रोलवर दौडू लागेल. गळतीबाबत चालकाला त्वरीत सूचना मिळणार आहे. पंचमध्ये 210 लिटरची बुट स्पेस दिली आहे.









