ऑनलाईन टींम / मुंबई
लष्कर-ए-तैयबाच्या (एलईटी) पाच संशयित दहशतवाद्यांना गुरुवारी जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर आणि सोपोरमध्ये अटक करण्यात आली. या दहशतवाद्यांकडून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेले दहशतवादी दहशतवादी गटाला शस्त्रे, दारूगोळा आणि रसद पुरवण्यात तसेच दहशतवाद्यांना मदत करण्यात गुंतले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
ही कारवाई श्रीनगरमधील रंगरेथ रोडवर सेट सनत नगर चौकाच्या परिसरात करण्यात आली. या कारवाईत पोलीस आणि राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांनी उभारलेल्या विशेष चेकपोस्टवर करण्यात आली. नावेद शफी वाणी आणि फैजान रशीद तेली अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत. यापुर्वीही हे दोघे श्रीनगर जिल्ह्यात दहशतवाद्यांना, शस्त्रे आणि स्फोटकांची वाहतूक आणि प्रतिबंधित दहशतवादी संघटना एलईटीच्या दहशतवाद्यांना रसद पुरवण्यात गुंतले असल्याचे प्रवक्त्याने सांगितले. त्यांच्याकडून सहा पिस्तुल, मॅगझिन, गोळ्या, एक ग्रेनेड आणि जिलेटिनच्या काठ्या, वायर आणि आठ डिटोनेटर्स जप्त करण्यात आले आहे