नवी दिल्ली
दिल्ली पोलिसांनी नवी दिल्ली रेल्वेस्थानकावर लष्कर-ए-तोयबा मॉड्यूलच्या सक्रीय दहशतवाद्याला अटक केली आहे. कुपवाडा येथे भांडाफोड करण्यात आलेल्या दहशतवादी मॉड्यूलच्या प्रमुखांपैकी एका दहशतवाद्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. या दहशतवाद्याचे नाव रियाज अहमद असल्याचे समोर आले आहे. सीमेपलिकडून शस्त्रास्त्रs तसेच दारूगोळा आणण्याच्या कटात त्याचा सहभाग होता. त्याच्याकडून एक मोबाइल फोन हस्तगत करण्यात आला आहे.









