मुंबई :
जिंदाल स्टील अँड पॉवर यांचा समभाग शेअरबाजारात मोठ्या प्रमाणात बुधवारी घसरणीत असताना दिसला आहे. बीएसईवर बुधवारी समभाग 7 टक्के इतका कोसळत 590 रुपयांवर खाली आला होता. तीन महिन्यांनंतर कंपनीच्या समभागाने नीचांकी स्तर गाठला होता. कंपनीचा सप्टेंबरचा तिमाही निकाल जाहीर झाला आहे. कंपनीने 2213 कोटींचा नफा प्राप्त केल्याची माहिती आहे. जो 19 टक्के अधिक आहे.









