मुंबई
ब्ल्यू जेट हेल्थकेअरचा समभाग बुधवारी शेअरबाजारात 10 टक्के प्रिमीयमसह सूचिबद्ध झाला आहे. सदरचा समभाग याप्रकारे एनएसईवर बुधवारी 380 रुपयांवर व्यवहार करत होता. समभागाची इशु किंमत 346 रुपये प्रति समभाग अशी होती. बाजारात लिस्ट झाल्यावर या समभागाने 398 रुपयांवर पोहचण्यात यश मिळवलं होतं. कंपनी जवळपास 300 जागतिक स्तरावरील ग्राहकांना सेवा देत आली असून यात कोलगेट पाम्होलीव्ह, युनिलिव्हर यासारख्या दिग्गज कंपन्यांचा समावेश आहे.









