मुंबई
: अपोलो मायक्रो सिस्टीमचा समभाग शेअरबाजारामध्ये 7 टक्के इतका वाढला असल्याचे पाहायला मिळाले. कंपनीने सप्टेंबर अखेरचा तिमाही नफा जाहीर केला असून त्याचाच सकारात्मक परिणाम कंपनीच्या समभागावर बाजारात पाहायला मिळाला. एकत्रित निव्वळ नफा 6.56 कोटी रुपये इतका सप्टेंबरच्या तिमाहीमध्ये कंपनीने प्राप्त केला आहे. वर्षामागे 1.64 कोटी रुपये नफा कंपनीने मिळविला होता. समभाग 7 टक्के वाढत 120 रुपयांवर पोहोचला होता.









