कोलकाता :
अभियांत्रिकी आणि बांधकाम क्षेत्रातील दिग्गज कंपनी लार्सन टुब्रो यांनी आपला पहिल्या तिमाहीचा निकाल जाहीर केला असून निव्वळ नफ्यात 30 टक्के वाढ नोंदवली असल्याचे समजते. एप्रिल ते जून या तिमाहीत कंपनीने 3617 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा प्राप्त केला आहे. त्याचप्रमाणे महसुलातही 15 टक्के इतकी वाढ नोंदवली असून कंपनीने 63,679 कोटी रुपये महसुलरुपी प्राप्त केले आहेत. सदरच्या तिमाहीकरीता कंपनीकडे 94,453 कोटींची कामे होती. कंत्राटातही कंपनीने 33 टक्के वाढ दर्शवली आहे. यात आंतरराष्ट्रीय कामाचे कंत्राट 48675 कोटींचे होते. एकंदर कामाच्या कंत्राटात जागतिक कंत्राटांचा वाटा 52 टक्के इतका आहे. येणाऱ्या काळातही कंपनीची कामगिरी चांगली असणार असल्याचा विश्वास कंपनीला आहे.









