वृत्तसंस्था / नवी दिल्ली
न्यूझीलंडच्या पुरूष क्रिकेट संघाच्या निवड व्यवस्थापकपदी गेवीन लार्सनची नियुक्ती क्रिकेट न्यूझीलंडने केली आहे. न्यूझीलंड संघाच्या निवड व्यवस्थापक पदाची जबाबदारी यापूर्वी सॅम वेल्स यांच्यावर सोपविण्यात आली होती. वेल्स यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिकामे झाले होते.
गेवीन लार्सन न्यूझीलंडचा माजी वनडे आणि कसोटी क्रिकेटपटू आहे.न्यूझीलंड क्रिकेटक्षेत्रामध्ये लार्सन यांनी विविध पदे भूषविली आहेत. क्रिकेट वेलिंग्टनचे ते प्रमुख कार्यकारी होते. 3 नोव्हेंबरपासून लार्सन आपल्या नव्या पदाची सुत्रे हाती घेतली.









