मुंबई :
लार्सन अँड टुब्रो या कंपनीला नुकतीच 2500 ते 5 हजार कोटी रुपयांच्या कामाची ऑर्डर प्राप्त झाली असून याचा परिणाम सोमवारी शेअरबाजारात समभागावर सकारात्मक पाहायला मिळाला. बीएसईवर सोमवारी इंट्रा डे दरम्यान समभागाचा भाव 0.35 टक्के वाढत 2482 रुपयांवर पोहोचला होता. अभियांत्रिकी व बांधकाम क्षेत्रातील लार्सन अँड ट्रूब्रोला हनुमानगंज मल्टीग्रुपकडून उत्तर प्रदेशमध्ये कामाचे कंत्राट मिळाले आहे.









