Largest extraordinary human artefact found at Baparde
देवगड तालुक्यातील बापर्डे, रेडेटाका येथील कातळचित्र हे सुरेख देखणे असून ते आता पर्यंत खुप प्रसिध्द झाले आहे. दोन तिन वर्षापुर्वी हे कातळचित्र देवगडच्या इतिहास संशोधन मंडळाला आढळले होते. त्यानंतर सातत्याने या कातळचित्राचा अभ्यास करण्यासाठी व इतर अभ्यासकांना दाखवण्यासाठी रणजित हिर्लेकर व अजित टाककर हे या भागात असत. चारच दिवसांपुर्वी पाळेकर वाडी येथील काही नवीन सापडलेल्या कातळ चित्रांचा अभ्यास करण्यासाठी ते गेले होते. परत येत असताना बापर्डे येथील एका घराच्या अंगणातील कातळशिल्प पहाण्यास गेले असता सायंकाळी साडे सहा वाजता काळोख पडत असताना त्यांना श्री. श्रीकांत नाईकधुरे यांच्या कलमाच्या बागेत एक विलक्षण कातळ शिल्प पहायला मिळाले.कोकणातील कातळचित्राच्या दुनियेत हे कातळचित्र अतिशय वेगळे आहे. हे लक्षात येताच लगेचच या कातळचित्रांची साफसफाई व डाँक्युमेंटेशन करण्यासाठी नाईकधुरे यांच्याशी बोलुन टाककर व हिर्लेकर यांनी नव्या मोहीमेची योजना केली. सोमवार दि.१३ फेब्रुवारी रोजी सकाळीच या जागी पोहोचुन त्याची साफसफाई करण्यात आली. या कामी साक्षी राणे, गौरव सोमले व निना हिर्लेकर या देवगड काँलेजच्या विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.
या कातळचित्रा विषयी माहीती देताना प्राच्यविद्या अभ्यासक श्री रणजित हिर्लेकर म्हणाले, “हा जवळपास विस ते पंचविस कातळचित्रांचा एकत्रित समुह आहे. यातील मानवाकृती कातळचित्र हे आता पर्यंत सापडलेल्या सर्व मानवाकृतींमधे अतिशय विलक्षण व अलंकार तोरणांनी अलंकृत आहे. जवळपास पंधरा ते सहा फुट रुंदीच्या आयाताकृती चौरसात सर्व जागा व्यापेल अशी ही मानवाकृती आहे. आतापर्यंत देवगड तालुक्यात सापडलेल्या मानवाकृती कातळचित्रात ही सर्वात मोठी मानवाकृती आहे. ही संपुर्ण फेम विविध प्रकारे सजवली नटवली आहे.
देवगड/प्रतिनिधी









