वृत्तसंस्था / लखनौ
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये पोलिसांनी एका अवैध शस्त्रनिर्मिती कारखान्यावर धाड टाकून मोठा शस्त्रसाठा हस्तगत केला आहे. शेकडो काडतुसे, 100 हून अधिक देशी पिस्तुले, देशी बंदुका आणि हातबाँब सापडले आहेत. या अवैध कारखान्याचा चालक आणि ही शस्त्रे निर्माण करणारा सलाउद्दिन याला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी करण्यात येत आहे.
मोहरमच्या आधी हा शस्त्रसाठा हाती लागल्याने मोठे कारस्थान उध्वस्त करण्यात आले असल्याचे प्रतिपादन पोलीसांनी केले. जप्त केलेल्या शस्त्रांमधील काही अन्य ठिकाणांहून लखनौमध्ये आणण्यात आलेली आहेत, असे दिसून आले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात ही शस्त्रे का साठविण्यात आली होती, याची चौकशी केली जात आहे. शहरात आणि राज्यात दंगल घडविण्याचा आणि मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडविण्याचा हा प्रयत्न होता काय, याचीही चौकशी केली जात आहे.









