रिलायन्स स्टोअर खरेदीवर 10एक्स रिवॉर्ड पाँईट्स : आकर्षक सवलतीचा मिळणार लाभ
नवी दिल्ली
स्टेट बँक ऑफ इंडिया कार्डने (एसबीआय) रिलायन्स रिटेलच्या सहकार्याने ‘रिलायन्स एसबीआय कार्ड’ लाँच केले आहे. हे कार्ड दोन प्रकारांमध्ये सादर करण्यात आले आहे, ज्यामध्ये रिलायन्स एसबीआय कार्ड आणि रिलायन्स एसबीआय कार्ड प्राइम यांचा समावेश करण्यात आल्याची माहिती आहे. रिलायन्स रिटेल इकोसिस्टममधील स्टोअरमध्ये या दोन को-ब्रँडेड क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यावर विशेष फायदे आणि रिवॉर्ड पॉइंट्स दिले जाणार असल्याचेही सांगितले आहे. एसबीआयने दिलेल्या विविध ऑफरही या कार्डवर उपलब्ध असतील. रिलायन्सने एक निवेदन जारी करून याबाबत माहिती दिली आहे.
लॉन्च झाल्यानंतर, दोन्ही क्रेडिट कार्ड एसबीआय कार्डच्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करण्यासाठी उपलब्ध झाले आहेत.
एसबीआय सोबत भागीदारी करण्यास उत्सुक
व्ही सुब्रमण्यम, संचालक, रिलायन्स रिटेल म्हणाले, ‘आम्ही कार्ड उद्योगातील प्रमुख एसबीआय सोबत भागीदारी करण्यास उत्सुक आहोत. रिलायन्स एसबीआय कार्ड ग्राहक आमच्या ऑनलाइन वेबसाइट आणि स्टोअर्सवर खरेदी करतील त्यांना विशेष सूट, बक्षिसे यासह बरेच फायदे मिळणार आहेत. आम्हाला आशा आहे की एसबीआय कार्डसह, आम्ही अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करत राहू आणि आमच्या ग्राहकांना आनंद देत राहू.
प्रमुख ग्राहक वर्गासाठी रिलायन्स एसबीआय कार्ड लॉन्च केले. एसबीआय कार्डचे एमडी आणि सीईओ अभिजीत चक्रवर्ती म्हणाले, रिलायन्स एसबीआय कार्ड प्रमुख ग्राहक वर्गासाठी लॉन्च करण्यात आले आहे. आमच्या को-ब्रँडेड पोर्टफोलिओमध्ये ही एक शक्तिशाली भर आहे. आम्हाला आशा आहे की सार्वत्रिक वापराच्या मार्गांचा विचार करून ते लोकप्रिय क्रेडिट कार्ड बनणार असल्याचाही दावा करण्यात आला आहे.









