वृत्तसंस्था/ सिडनी
ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू तसेच कर्णधार मेग लॅनिंगचे ऑस्ट्रेलियन संघात पुनरागमन झाले आहे. ऑस्ट्रेलिया आणि पाक यांच्यात होणाऱया आगामी वनडे मालिकेसाठी आता लॅनिंगकडे पुन्हा कर्णधारपद सोपविले जाईल असे वाटते.
मध्यंतरी लॅनिंगने काही अज्ञात धमक्यामुळे क्रिकेट क्षेत्रातून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या ऑगस्टमध्ये 30 वर्षीय लॅनिंगने या क्षेत्रातील शेवटचा सामना खेळला होता. लेनिंगच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते. आता ऑस्ट्रेलिया आणि पाक यांच्यात पुढील महिन्यात वनडे मालिका ऑस्ट्रेलियामध्ये खेळवली जाणार असून ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व लॅनिंगनेकडे सोपवण्यात येणार असल्याचे समजते.









