वृत्तसंस्था/ कोलंबो
यजमान लंका आणि पाकिस्तान यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला गॅलेमध्ये 15 जुलैपासून प्रारंभ होत आहे. या कसोटी मालिकेसाठी क्रिकेट श्रीलंकेने 16 जणांचा संघ जाहीर केला असून दिमूथ करुणारत्नेकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. या मालिकेतील दुसरी कसोटी कोलंबोत 24 जुलैपासून सुरू होणार आहे.
या मालिकेसाठी लंकन निवड समितीने दिलशान मधुशंकाची निवड केली आहे. मधुशंकाने आतापर्यंत 6 वनडे आणि 11 टी-20 सामने खेळले आहेत. या मालिकेसाठी कुशल मेंडिस, मॅथ्यूज, चंडिमल, धनंजय डिसिल्वा, रमेश मेंडिस हे लंकन संघातील प्रमुख खेळाडू आहेत.
लंकन संघ- डी करुणारत्ने (कर्णधार), निशांत मधुश्का, कुशल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडिमल, धनंजय डिसिल्वा, पी. निशांका, एस. समरविक्रमा, कमिंदू मेंडिस, रमेश मेंडिस, प्रभास जयसुर्या, पी. जयविक्रमा, के. रजिता, दिलशान मधुशंका, विश्वा फर्नांडो आणि एल. मानसिंघे.









