कोलंबो / वृत्तसंस्था
अलीकडेच आशिया चषक जेतेपद संपादन करणाऱया श्रीलंकेने आयसीसी टी-20 वर्ल्डकपसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला असून दुष्मंता चमीरा व लाहिरु कुमारा यांना त्यात स्थान दिले आहे. मात्र, तंदुरुस्त असल्यास त्यांना स्पर्धेत सहभाग घेता येईल. ऍशेन बंदारा, प्रवीण जयविक्रमा, दिनेश चंडिमल, बिनुरा फर्नांडो व नुवानिदू फर्नांडो राखीव खेळाडूत समाविष्ट असतील. यातही बंदारा व जयविक्रमा हे दोनच खेळाडू संघासमवेत ऑस्ट्रेलियाला जातील.
आशिया चषक स्पर्धेत खेळलेले बहुतांशी खेळाडू या स्पर्धेसाठी संघात समाविष्ट आहेत. जलद गोलंदाज दुष्मंता चमीरा अद्याप ढोपराच्या दुखापतीतून सावरलेला नाही. त्यामुळे, तंदुरुस्ती सिद्ध केली तरच त्याला संघात स्थान मिळेल.

टी-20 वर्ल्डकपसाठी लंकन संघ ः दसून शनाका (कर्णधार), दनुष्का गुणतिलका, पथूम निसांका, कुशल मेंडिस, चरिथ असलंका, भानुका राजपक्ष, धनंजया डीसिल्व्हा, वणिंदू हसरंगा, महिश तिक्षणा, जेफ्री व्हॅन्डरसे, चमिका करुणारत्ने, जेफ्री व्हॅन्डरसे, चमिका करुणारत्ने, दुष्मंता चमीरा, लाहिरु कुमारा, दिलशान मदुशनका, प्रमोद मदुशन.
राखीव खेळाडू ः ऍशेन बंदारा, प्रवीण जयविक्रमा, दिनेश चंडिमल, बिनुरा फर्नांडो, नुवानिदू फर्नांडो.









