`
सध्या भारतात सुरू असलेल्या आयसीसीच्या 2023 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील शनिवारी येथे खेळवण्यात आलेल्या दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या सामन्यात लंकन संघाला षटकांची गती राखता आली नसल्याने त्यांना आयसीसीने मानधन रकमेतील 10 टक्के रक्कम दंड म्हणून ठोठावली आहे.
आयसीसीचे सामनाधिकारी जवागल श्रीनाथ यांनी हा निर्णय घेतला आहे. या सामन्यात निर्धारित वेळेत शनाकाच्या लंकन संघाला 50 षटके पुरी करता आली नाहीत. त्यांना दोन षटके कमी पडल्याने शनाकाला आयसीसीने दोषी ठरवले. शनाकाने आपली चूक कबुल केली असल्याचे सांगण्यात आले. या सामन्यात रिचर्ड इलिंगवर्थ, शाहीद सैकत हे मैदानावरील पंच होते. तर मायकेल गॉ तृतीय पंच आणि अॅलेक्स व्हेर्फ हे चतुर्थ पंच असून त्यांनी लंकन संघावर ही कारवाई करण्याचा अहवाल आयसीसीकडे सादर केला होता.









