वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील लंका आणि बांगलादेश यांच्यातील सामना सोमवारी 6 रोजी दिल्लीच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी बांगलादेश आणि लंकन संघाचे येथे बुधवारी आगमन झाले होते. बांगलादेश संघ येथे बुधवारी दाखल झाला होता तर शुक्रवारी या दोन्ही संघांनी मैदानात सराव करण्यासाठी प्रवेश केला पण दिल्लीतील दुषित हवामानामुळे लंकन संघाला आपला सराव रद्द करावा लागला. बांगलादेशच्या खेळाडूंनाही दुषित आणि खराब हवामानाचा फटका बसला आहे. शनिवारी दिल्लीतील हवामान फारसे सुधारले नसल्याने हे दोन्ही संघ सरावासाठी वाट पहात होते.









