समिती नियुक्त करण्याचा निर्णय देण्यात आला आहे.
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लंकन शासनाने लंकन क्रिकेट मंडळाच्या व्यवहारामध्ये हस्तक्षेप करत असल्याचे आढळून आल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने लंकन मंडळावर निलंबनाची कारवाई केली होती. भ्रष्टाचाराचा आरोप करून सरकारने लंकन क्रिकेट मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. पण हा निर्णय मागे घेतल्याचे लंकन क्रीडा मंत्र्यांनी सांगितले.
आयसीसीकडून लंकन क्रिकेट मंडळावर निलंबनाचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान लंकन क्रिकेट मंडळाने हंगामी स्वरुपी मंडळ नियुक्त करावे, असे सूचित करण्यात आले होते. आयसीसीकडून घेण्यात आलेल्या निलंबनाचा निर्णय उठवावा यासाठी लंकन क्रिकेट मंडळाकडून हंगामी स्वरुपी समिती नियुक्त करण्याचा निर्णय देण्यात आला आहे.









