सांगली: चांदोली अभयारण्य क्षेत्रात झालेल्या सलगच्या अतिवृष्टीमुळे अभयारण्य क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याच्या घटना घडल्या आहेत. चांदोली अभयारण्य कडे जाताना अनेक ठिकाणी डोंगर खचून झाडे, माती आणि दगड रस्त्यावर आले आहेत. यामुळे डोंगर उतारावर वाड्या -वस्त्यावर राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनानं आधीच सुरक्षित स्थळी हलवलं.
एकीकडे अतिवृष्टीमुळे चांदोली धरणाची पाणी पातळी वाढली असताना दुसरीकडे चांदोली अभयारण्य क्षेत्रा मधील डोंगर परिसरात भूस्खलन होत असल्याने प्रशासन अलर्ट झाले असून ज्या डोंगर भागात लोक राहण्यास आहेत तेथील नागरिकांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलवले आहे.
Previous Articleओबीसी आरक्षण प्रकरण न्यायालयात
Next Article संत मीरा संघाला सर्वसाधारण विजेतेपद









