जकार्ता :
इंडोनेशियाच्या सुलावेसी बेटावर सोन्याच्या खाणीत भूस्खलन झाले आहे. या आपत्तीनंतर बचावपथकाने ढिगारा हटवून लोकांचा शोध चालविला आहे. भूस्खलनामुळे कमीतकमी 23 जणांचा मृत्यू झाला आहे. बोन बोलांगो या गावात 100 हून अधिक ग्रामस्थ खोदकाम करत असताना आसपासच्या पर्वतांवरून अनेक टन मातीचा ढिग खाली कोसळला होता. 46 जण भूस्खलनाच्या तावडीत सापडण्यापासून वाचले. तर बचाव पथकाने 23 जणांना जिवंत बाहेर काढले असून यातील 18 जण जखमी झाले आहेत. तर तीन महिला आणि चार वर्षीय मुलासमवेत 11 मृतदेह हाती लागले आहेत. भूस्खलनामुळे सुमारे 300 घरांचे देखील नुकसान झाले आहे. तर 1 हजारांहून अधिक लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.









