वृत्तसंस्था / मेलबोर्न
येथे रविवारी होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ग्रा.प्री. एफ-1 मोटार रेसिंग शर्यतीसाठी झालेल्या सराव सत्रामध्ये मॅक्लेरेन चालक लॅन्डो नोरीस आणि ऑस्कर पिसेट्री यांनी विद्यमान विजेत्या मॅक्स र्व्हस्टेपनला मागे टाकत पोल पोझिशन पटकाविले.
शनिवारी झालेल्या सराव सत्रामध्ये नोरीस आणि पिसेट्री यांनी 0.084 सेकंदाचा अवधी घेत आघाडीचे स्थान मिळविले. त्यांनी र्व्हस्टेपनपेक्षा 0.385 सेकंदाचा जलदवेळ नोंदविला. र्व्हस्टेपनला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.









