वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथे नियंत्रण रेषेजवळ भूसुरुंगाच्या स्फोटात लष्कराचे दोन सामग्री वाहक (पोर्टर) जखमी झाले. नौशेरा सेक्टरमधील कलाल भागात झालेल्या स्फोटात मंगिओट गावचे रहिवासी राजकुमार आणि अश्विनी कुमार जखमी झाल्याचे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले. दोन्ही जखमी पोर्टर्सना ऊग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घुसखोरी रोखण्यासाठी सीमावर्ती भागात भूसुरुंग टाकले जातात. त्यावरील खुणा पावसामुळे वाहून गेल्यामुळे ते योग्यपणे निदर्शनास येत नाहीत. अशा स्थितीत अशा स्वरुपाच्या दुर्घटना घडतात.









