वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारचे माजी मंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांचे मोठे पुत्र तेजप्रताप यादव यांनी आगामी विधानसभा निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली आहे. आपण स्वत: महुआ विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे तेजप्रताप यादव यांनी शनिवारी जाहीर केले आहे. त्यांनी ‘टीम तेजप्रताप यादव’ स्थापन करून आपल्या समर्थकांना एकत्रित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ‘टीम तेजप्रताप यादव’ हा राजकीय पक्ष नाही तर एक खुले व्यासपीठ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘टीम तेजप्रताप यादव’मध्ये सर्वांना सामील होण्याची आणि काम करण्याची संधी मिळेल. आमचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत असे सांगतानाच सध्या राजकीय पक्ष सुरू करण्याची कोणतीही योजना नाही, असेही त्यांनी सांगितले.









