ललित मोदी यांनी अभिनेत्री सुष्मिता सेन हिच्यासोबत लग्न करणार असल्याची पोस्ट शेअर करत सुष्मिता सेनच्य़ा चाहत्यांना धक्का दिला. मोदी एवढ्यावरचं शांत बसले नाहीत तर त्यांनी चक्क त्यांच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये बदल केला आहे. या बदलाचे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. शिवाय या बायोचे अनेक रिल्सही व्हायरलं होत आहेत. यामुळे सुष्मिताच्या चाहत्यांनी नाराजीचा सूर ओढला आहे.
ललित मोदी (Lalit Modi) यांनी इन्स्टाग्राम बायोमध्ये म्हटलंय की, सर्वसामान्य व्यक्तिमत्त्व, इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL चे संस्थापक असे लिहिले आहे. “अखेर मी माझ्या नव्या जोडीदारासोबत नवीन आयुष्य सुरु करत आहे. माझे प्रेम सुष्मिता सेन”, असेही त्यांनी त्यांच्या बायोमध्ये नमूद केले आहे. सध्या त्यांच्या या इन्स्टाग्राम बायोचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अनेकांनी त्यावरुन त्यांना ट्रोलही केले आहे.
हेही वाचा- सिंगापूर ओपनमध्ये पीव्ही सिंधूने पटकावले विजेतेपद
ललित मोदी याचं आधीच एक लग्न झालेलं आहे. १९९१ साली ललित मोदी आणि मिनल हे लग्नबंधनात अडकले होते. त्यांना दोन मुलंही आहेत. आलिया मोदी आणि रुचिर मोदी अशी त्या दोघांची नावे आहेत. रुचिर ललित मोदींसोबत लंडनमध्ये वास्तव्यास आहे. तर ललित मोदी यांची मुलगी काही दिवसांपूर्वी विवाहबंधनात अडकली. तर त्यांच्या पत्नीचे २०१८ साली कर्करोगाने निधन झालं. मोदी हे सुष्मिताचे जुने मित्र आहेत. त्यांच्यासोबतचा फोटोही तिने सोशल मिडियावर शेअर केला आहे. ते दोघे आता लग्नबंधनात अडकणार का हे पाहावे लागणार आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








