रोड-शोला नागरिकांची गर्दी
बेळगाव : बेळगाव ग्रामीण काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर यांचा रविवारी हिरेबागेवाडी भागात रोड-शो झाला. या रोड-शोच्या माध्यमातून त्यांनी जोरदार शक्तप्रदर्शन केले. या रोड-शोला काँग्रेसचे कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रारंभी श्री बसवेश्वर यांच्या मूर्तीचे पुष्पहार घालून लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर रोड-शोला प्रारंभ झाला. पुन्हा एकदा आम्ही तुम्हाला निवडून देणार असा ठाम निर्धार यावेळी उपस्थित काँग्रेसच्या कार्यकर्ते व महिलांनी केला. गेल्या पाच वर्षात मी प्रामाणिकपणे ग्रामीण मतदार क्षेत्रासाठी विकासकामे राबविली आहेत. तुम्ही पुन्हा एकदा संधी द्या आणि ग्रामीण मतदार क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मतदान करा, असे आवाहन लक्ष्मी हेब्बाळकर यांनी यावेळी केले. रोड-शोवेळी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. यावेळी विधानपरिषद सदस्य नागराज यादव, सी. सी. पाटील, सुरेश इटगी, अडिवेश इटगी, स्वाती इटगी, नाझरीन करिदावल, गौस जलीकोप्प, श्रीकांत मधुभरमण्णवर, बसनगौडा पाटील, सिद्धू पाटील, निंगाप्पा तलवार, सय्यद सनदी, कातल गोवे, शिवु हळमनी, इम्तियाज करिदावल, समीर देवलापूर, शब्बीर सत्तीगेरी, उळवाप्पा रोट्टी, सी. बी. शिंत्री, निंगाप्पा तलवार, बी. जी. वालीतगी, आर. बी. पाटील, गावातील नेते व हजारो समर्थक उपस्थित होते.









