वार्ताहर /किणये
बेळगाव ग्रामीण काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर मंगळवार दि. 18 रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी सोमवारी आपल्या चिक्कहट्टीहोळी गावातील घरचे आराध्यदैवत वीरभद्राचे त्यांनी दर्शन घेऊन विधिवत पूजा-अर्चा केली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणाऱ्या कागदपत्रांचीही पूजा करण्यात आली. घरचे आराध्यदैवत वीरभद्राचे दर्शन घेतल्यामुळे या निवडणुकीत मला पुन्हा यश मिळणार असून वीरभद्राचा आशीर्वाद महत्त्वाचा आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.









