बेळगाव : 2018 च्या निवडणुकीत दिलेल्या 98 टक्के आश्वासनांची पूर्तता करणाऱ्या बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी त्यांच्या आगामी प्रकल्पांची यादी प्रसिद्ध केली आहे.
प्रदेश काँग्रेसने दिलेल्या हमी योजनांसोबतच लक्ष्मी हेब्बाळकर यांनी या क्षेत्राला विकासाच्या मार्गावर नेण्याची आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण केली आहे.
शिक्षणात मागे पडलेल्या बेळगाव ग्रामीण भागात सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालय आणणार असल्याची घोषणा लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केली आहे. तसेच सरकारी आयटीआय महाविद्यालयांना मंजुरी देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. मतदारसंघासाठी मुरारजी निवासी शाळा, राणी चन्नम्मा निवासी शाळा मंजूर करण्याची घोषणाही त्यांनी केली.
लक्ष्मी हेब्बाळकर पुढे म्हणाल्या की, आपल्या मतदारसंघात 100 खाटांचे माता-बाल रुग्णालय बांधण्यात येणार आहे. तसेच मतदारसंघातील सर्व 112 तलाव भरण्याची योजना आणणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे बागेवाडी व उचगाव येथे उच्च दर्जाचे प्राथमिक आरोग्य केंद्र बांधण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
ग्रामीण भागात टेक्सटाईल पार्क उभारण्याची घोषणा करण्यासह, या भागात धावणाऱ्या जुन्या बसेसच्या जागी नवीन बसेस आणणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच तरुणींना स्वयंरोजगार, इंडस्ट्रियल कॉरिडॉर, कौशल्य प्रशिक्षण केंद्र, यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मागील काळात आपला दिलेला शब्द पाळला त्यामुळेच तर त्या ग्रामीण मतदार संघाची सर्व घरची कन्या म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळे आता दिलेला शब्दही पुढील काळात पूर्तता करतील, असा विश्वास मतदारांना आहे.
या सर्व योजना राबविण्यासाठी १० मे रोजी होणाऱ्या निवडणुकीत माझ्या मतदार बंधू भगिनींनी मला मतदान करावे आणि आशीर्वाद द्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
प्रकल्पांची यादी
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय,
शासकीय आयटीआय कॉलेज,
मुरारजी देसाई निवासी शाळा,
कित्तूर राणी चन्नम्मा निवासी शाळा,
100 खाटांचे मदर-चाइल्ड हॉस्पिटल,
मतदारसंघातील सर्व 112 तलाव भरणे,
2 दर्जेदार आरोग्य केंद्र,
टेक्सटाईल पार्कचे बांधकाम,
ग्रामीण भागासाठी नवीन बसेस,
इंडस्ट्रियल कॉरिडॉर, कौशल्य प्रशिक्षण केंद्र