सांगली : लिंगनूर (ता. मिरज) ( Miraj ) येथे अवधूत आणि शिवदूत शंकर माळी या २०-२२ वर्षांच्या भावंडांनी जीवापाड वाढविलेली द्राक्षबाग वटवाघुळांनी एका रात्रीत फस्त केली आहे. सुमारे सात लाख रुपयांची द्राक्षे नष्ट झाली. या दणक्याने तरुण शेतकरी कोलमडून गेले आहेत.
लिंगनूरमध्ये पाझर तलावानजिक माळी यांची आरके जातीची द्राक्षबाग होती. गेली १०-१५ वर्षे माळी कुटूंब द्राक्षे पिकविते. यावर्षी वडील अंथरुणाला खिळून असल्याने भावंडांनीच बाग सांभाळली. चांगल्या दराच्या अपेक्षेने जूनमध्ये छाटणी घेतली. पाऊस, वाऱ्या-वादळापासून बचावासाठी छत घातले. बागेतील माती व चिखलामुळे द्राक्षघड खराब होऊ नयेत यासाठी सरींमध्येही कागद अंथरला. ट्रॅक्टर चालविल्यास, कागद फाटेल म्हणून पाईपने औषधे फवारली. बाग चांगलीच फळली. धुवाँधार पावसातही टिकून राहिली. व्यापाऱ्यांनी ५३० रुपयांना चार किलो असा विक्रमी भाव सांगितला. दिवाळीनंतर उतरणीचे नियोजन होते, तत्पूर्वीच वटवाघुळांचा हल्ला झाला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








