वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
डब्ल्यूटीए टूरवरील झालेल्या हाँगकाँग खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत कॅनडाची नवोदीत टेनिसपटू लैला फर्नांडिसने एकेरीचे जेतेपद पटकाविताना कॅटरीना सिनियाकोव्हाचा पराभव केला. तब्बल 19 महिन्यानंतर कॅनडाच्या फर्नांडिसचे हे पहिले तर वैयक्तिक टेनिस कारकिर्दीतील तिसरे विजेतेपद आहे.
या स्पर्धेतील झालेल्या अंतिम सामन्यात फर्नांडिसने झेकच्या सिनिया कोव्हाचा 6-3, 6-4 असा पराभव केला. हा सामना 2 तास चालला होता.









