तृणमूल खासदाराचे सिंधिया यांना उद्देशून वादग्रस्त वक्तव्य
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी बुधवारी लोकसभेत भाजप नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांना लेडी किलर असे संबोधल्यानंतर सभागृहात गदारोळ झाला. या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. या मुद्द्यावरून भाजपने बॅनर्जी यांच्या निलंबनाची मागणी केली आहे.
तृणमूल काँग्रेसचे नेते कल्याण बॅनर्जी सभागृहात आपत्ती व्यवस्थापनावर आपले मत मांडत होते. यादरम्यान, केंद्रीय मंत्री नित्यानंद राय आणि सिंधिया यांनी अडवणूक करण्यास सुरुवात केली. यावरून दोन्ही सदस्यांमध्ये जोरदार वादावादी झाली. त्यावेळी पीठासीन अधिकारी ए. राजा यांनी दोघांनाही थांबवण्याचा प्रयत्न केला, पण कल्याण बॅनर्जी थांबले नाहीत.









