काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना पंतप्रधानांच्य़ा भारताच्या एक इंचही जमिनीवर चीनचे अतिक्रमण नसल्याचा दावा खोडून काढत चीनने भारताच्या हजारो किलोमीटर जागेवर कब्जा केल्याचा दावा केला आहे. कारगील दौऱ्यावर असलेल्या राहूल गांधी यांनी हे विधान केले आहे.
कारगील दौऱ्यावर असलेल्या राहूल गांधी यांनी एका जाहीर सभेला संबोधित करताना राहूल गांधी म्हणाले, “लडाख हे एक मोक्याचे ठिकाण आहे. मी पॅंगॉन्ग त्सो सरोवरावर आल्यावर मला स्थानिकांकडून चीनने भारताची हजारो किलोमीटर जमीन घेतली असल्याचे कळाले आहे. लडाखची एक इंचही जमीन कोणीही हिसकावून घेतली नसल्याचा दावा पंतप्रधान मोदी विरोधी पक्षाच्या बैठकीत केला होता हे खुपच दुर्दैव आहे. तसेच त्यांचा हा दावाच खोटा आहे.” असे मत व्यक्त केले.
पुढे बोलताना ते म्हणाले, “लडाखमधील प्रत्येक व्यक्तीला चीनने भारताच्या जमीनवर कब्जा केल्याचे माहीत आहे. पण पंतप्रधान या मुद्द्यावर बोलायला तयार नाहीत,” असा आरोपही त्यांनी केला. राहुल गांधी यांनी 20 ऑगस्ट रोजी पॅंगॉन्ग- त्सो तलाव परिसराला भेट दिली होती. राहूल गांधी यांनी आपले दिवंगत वडील माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा वाढदिवसही या परिसरात साजरा केला. या कार्यक्रमात त्यांनी लडाखच्या लोकांचे युद्धपरीस्थितीत घेतलेल्या भूमिकेचेही त्यांनी कौतुक केले. ते म्हणाले “लडाख आणि कारगिल मधील लोक जेव्हा जेव्हा सीमेवर युद्ध झाले, तेव्हा भारतासोबत उभे राहिले. आणि हे एकदाच नाही तर अनेक वेळा सिद्ध झाले आहे.” असेही त्यांनी म्हटले आहे.