पोलीस प्रशासनाच्या पाहणीत आढळल्या त्रुटी:नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे
कोल्हापूर/ आशिष आडिवरेकर
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराबाबत पोलीस प्रशासनाने केलेल्या सुरक्षातपासणीत मंदिराबाबतच्या काही गंभीर उणीवा समोर आल्या आहेत. याचा अहवाल पोलीस प्रशासनाने जिल्हा प्रशासनास दिला आहे. यामध्ये मंदिरालगत असणारे सर्व चप्पल स्टँड हटविणे, मंदिराभोवती वॉच टॉवर उभे करणे, चारही दरवाजांवर कायमस्वऊपी बॅगस्पॅनर बसविणे, मंदिराभोवती असणाऱ्या उंच इमारतीभोवती लोखंडी जाळ्या मारण्याच्या सुचना केल्या आहेत. मंदिराची सुरक्षा भक्कम करण्यासाठी या उपाययोजना तातडीने करणे गरजेच आहे.
साडे तीन शक्ती पीठापैकी एक असणाऱ्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी नवरात्रौत्सव काळात देशभरातून लाखो भाविक येत असतात. अंबाबाई मंदिर हे संरक्षीत मर्मस्थळांच्या यादीमध्ये अ वर्गात असल्याने मंदिराच्या सुरक्षेबाबत अलर्ट असणाऱ्या प्रशासनाच्या काही उणीवा समोर आल्या आहेत. यामध्ये कायमस्वऊपी बॅग स्पॅनर नसणे, देवस्थान समिती कार्यालयाच्या पिछाडीस असणारी इमारत, तसेच मणकर्णीका कुंडा शेजारी असणाऱ्या लॉजवऊन मंदिराचा सहज दिसणारा परिसर, मंदिरालगतच असणारे दुचाकी, चारचाकी पार्किंग याचसोबत मंदिराच्या संरक्षक भिंतीजवळ वॉचटॉवर नसल्याचे धक्कादायक चित्र पहावयास मिळत आहे.
स्वतंत्र पोलीस चौकीचा प्रस्ताव प्रलंबितच
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरासाठी स्वतंत्र्य पोलीस ठाण्याचा प्रस्ताव आहे. मात्र गेल्या 11 वर्षापासून या पोलीस ठाण्यास मुहूर्तच मिळत नसल्याचे चित्र आहे. नजीकच जुना राजवाडा पोलीस ठाणे असल्याचे कारण देत हा प्रस्ताव रेंगाळला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास मंदिराच्या सुरक्षेचा प्रश्न कायमस्वऊपी निकालात निघेल. सद्या मंदिराच्या बाहेरील बाजूची सुरक्षा पोलीस प्रशासनाकडे आहे. तर आतील सुरक्षेची जबाबदारी देवस्थान समितीमार्फत नेमलेल्या सुरक्षायंत्रणेकडे आहे. सद्या हा वाद न्यायालयात आहे. मंदिराच्या आतमध्ये असणाऱ्या सुरक्षा रक्षकांना प्रत्येक वर्षी ट्रेनिंग देणे गरजेचे आहे.
कायमस्वऊपी बॅग स्पॅनरचा अभाव
नवरात्रोत्सव काळात मंदिर परिसरात बॅग स्पॅनर बसविण्यात येत आहे. मात्र हा स्पॅनर केवळ 10 दिवसांसाठीच बसविण्यात येणार आहे. मंदिराला चार दरवाजे असून केवळ एकाच दरवाजाबाहेर हा स्पॅनर बसविण्यात येणार आहे. मंदिर परिसरात कायमस्वऊपी चारही दरवाजाबाहेर विमानतळाप्रमाणे बॅग स्पॅनर बसवण्यात यावा अशा सुचना करण्यात आल्या आहेत. बॅग स्पॅनर बसविल्यास मंदिराची सुरक्षा भक्कम होवू शकते. मंदिरात कोणत्याही प्रकारचे हत्यार नेण्यास बंदी आहे. मात्र आतमध्ये जाणाऱ्या बॅगमधून कोणतेही हत्यार आतमध्ये नेले जावू शकते. यासाठी कायमस्वऊपी बॅग स्पॅनर बसविणे आवश्यक आहे. यामुळे धारदार वस्तू, किंवा हत्यार आत नेण्यास अटकाव होवू शकतो.
पासची तपासणी गरजेची
गतवर्षी नवरात्रोत्सव काळात देवस्थान समितीच्या वतीने 100 हून अधिक स्वयंसेवकांना ओळखपत्र दिली होती. हे स्वयंसेवक केवळ पालखीच्या वेळीच मंदिरात असतात. मात्र या पासची खातरजमा कोणाकडूनच केली जात नाही. देवस्थान समितीने हे पास देण्यापूर्वी पोलीस प्रशासनाकडून याचे क्रॉस व्हेरीफिकेशन होणे गरजेचे आहे.
दुचाकी, चारचाकी पार्किंग बंद करणे आवश्यक
विद्यापीठ हायस्कूल परिसरात भाविकांसाठी महापालीकेच्या वतीने हाकेच्या अंतरावर चारचाकी वाहनतळ उभारले आहे. हे वाहनतळ बंद करण्याची आवश्यकता असल्याचे अहवालात नमूद आहे. कारण वाहनांचे स्पॅनिंग करणारे स्पॅनर प्रशासनाकडे उपलब्ध नाही आहेत.ज्या पद्धतीने प्रशासनाने तातडीने चप्पल स्टँड हटविले त्याच धर्तीवर हे वाहनतळ बंद करणे गरजेचे आहे.
मंदिराच्या सुरक्षेसाठी या उपाययोजना आवश्यक
मंदिराभोवती वॉच टॉवर उभा करणे
मंदिराच्या भितीलगत असणारे सर्व चप्पल स्टँड हटविणे
मंदिरासाठी विशेष पोलीस चौकी, स्वतंत्र पोलीस स्टाफ
चारही दरवाजांवर कायमस्वऊपी बॅगस्पॅनर
चांगल्या दर्जाचे मेटल डिटेक्टर
मंदिरात हॉटलाईन वॉकीटॉकीची सुविधा
आपतकालीनसाठी एक मार्ग
मंदिरात येणाऱ्या प्रत्येक वस्तूचे स्पॅनिंग होणे गरजेचे
गर्दी टाळण्यासाठी कायमस्वऊपी पास इंट्री सुऊ करणे









